एलपीजी गॅस गळतीमुळे घराला आग; पाच जण होरपळले

पिंपरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पिंपरी-चिंचवडमध्ये एलपीजी सिलिंडरच्या गळतीमुळे घराला लागलेल्या आगीत पाच जण होरपळल्याची माहिती समोर आली. पिंपरी चिंडवड येथील बौद्ध नगर परिसरातील रहिवासी इमारतीत पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पिंपरीतील एका निवासी इमारतीतील बुधवारी सकाळी एका घरात गॅस गळतीमुळे आग लागली. या घटनेत पाच जण होरपळले. जखमींवर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. कनेक्टिंग पाईपमधून गॅस गळती झाल्याचा संशय आहे.’ मनोज कुमार, धीरज कुमार, गोविंद राम, राम कुमार आणि समंदर राम अशी जखमींची नावे आहेत.

Protected Content