बेपत्ता तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रविवारपासून बेपत्ता असलेल्या रोहिदास प्रकाश सोनवणे-भिल (वय- ३५, रा. मोहाडी ता. जळगाव) या तरुणाचा मृतदेह सवखेडा शिवारातील स्मशानभूमी जवळील तीन पुलाजवळ बुधवार ५ एप्रिल सकाळी १० वाजेच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. नातेवाईकानी त्याची ओळख पटवली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे रोहिदास सोनवणे हे आपल्या कुटुंबयासह वास्तव्यास होते. रविवारी २ एप्रिल रोजी संतापाच्या भरात रोहिदास हे घरातून निघून गेले होते. परंतु अद्याप ते घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबयांनी त्यांचा शोध सुरू केला. बुधवार 5 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता  सोनवणे यांच्या कुटुंबीय सावखेड शिवारात शोध घेत असतांना त्यांना स्मशान भूमीजवळील तीन पुलाजवळ एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोहेको लीलाधर महाजन, वासुदेव मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. घरातून निघून गेलेल्या रोहिदास यांचा शोध घेत होते. याचवेळी त्यांना तरुणच कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवारून त्याच्या नातेवाईकांनी रोहिदास यांची ओळख पटवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.

Protected Content