मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे रूग्णसेवक सुरज यादव यांचा गौरव

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जकारीया फाउंडेशन अकोला व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत कक्षाच्या वतीने  आरोग्य परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातून एकनिष्ठा जनसेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुरज शिवमुरत यादव यांच्यासह इतरांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला.

जकारीया फाउंडेशन अकोला व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत कक्षाच्या वतीने   अकोला, वाशिम, बुलढाणा, या तीन जिल्ह्यातील रूग्ण सेवकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बुलढाणा जिल्ह्यातून एकनिष्ठा जनसेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुरज शिवमुरत यादव यांच्यासह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश्वर निर्मळ, सदस्य गब्बू गुजरीवाल, स्वप्निल वाकोडे यांनी केलेल्या सामाजिक तथा रूग्णसेवेच्या कामाची दखल घेत जावेद  जकारीया  अध्यक्ष जकारीया फाउंडेशन अकोला अकोला यांनी एकनिष्ठा जनसेवा फाउंडेशनच्या कामाची दखल म्हणुन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालयचे  मंगेश चिवटे  यांच्याहस्ते एकनिष्ठा फाउंडेशनचे सुरज शिवमुरत यादव यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ. अमोल रावणकर, सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ, आ. राजुदादा भोर सहायता कक्ष प्रमुख अकोला, अलीमचंदाणी, विवेक पारस्कर सर, मा. आ. गोपीकिसन बाजोरीया , इत्यादी मान्यवर व वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Protected Content