जळगाव प्रतिनिधी । शहरातल्या आकाशवाणी चौकातील एक फलक (होर्डीग) आज दुपारी जोरदार हवेमुळे अचानक कोसळल्याने काही काळ धावपळ उडाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातल्या आकाशवाणी चौकात मजूर फेडरेशनच्या समोर एक भव्य उभा फलक लावण्यात आलेला आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास हा फलक जोराच्या वार्यामुळे अचानक कोसळला. यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरात काही काळ धावपळ उडाली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. हा फलक एका कारवर आदळला असून यात या कारचे किरकोळ नुकसान झाल्याचे माहिती समोर आली आहे.