धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील भवरखेडा शिवारातील शेतात काम करत असतांना तरूणीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवार २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता समोर आला. याप्रकरणी शनिवारी २७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील भवरखेडा गावातील एका भागात २३ वर्षीय आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता तरूणी ही भवरखेडा शिवारातील शेतात काम करत असतांना त्याठिकाणी अधिकार एकनाथ पाटील हा तरूणीकडे आला, माझ्याशी फोनवर बोल, जर माझ्याशी बोलली नाही तर मी तुझी बदनामी करेन असे बोलत तिचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर तरूणीने शनिवारी २७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी अधिकार पाटील याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील हे करीत आहे.