यावल ( प्रतिनिधी ) ना. हरीभाऊ जावळे हे सर्व धर्म व जातींना न्याय देणारे समाजकारणी असून या निवडणुकीत जनता याची परतफेड करून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार असल्याचा आशावाद भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा बाजार समितीचे माजी सभापती हिराभाऊ चौधरी यांनी व्यक्त केला. ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
हिराभाऊ चौधरी हे यावल तालुक्यातील वनोली येथील रहिवासी असून पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाशी निष्ठावंत आहेत. आपल्या आजवरच्या वाटचालीत ना. हरीभाऊ जावळे यांच्यासोबत ते सावलीसमान राहिले आहेत. या पार्श्वभूमिवर लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत हरीभाऊंच्या सर्वसमावेशकतेबाबतचे अनुभव सांगितले. ते म्हणाले की, सब समाज को साथ लिये है चलते जाना ही भारतीय जनता पक्षाची विचारधार हरीभाऊंनी पूर्णपणे आपल्या आचरणातून दाखवून दिली आहे. सबका साथ सबका विश्वास या ध्येयवाक्यानुसार त्यांनी आपल्या दोन दशकांच्या राजकीय कारकिर्दीत कोणताही भेदभाव केला नाही. यात विकासकामांचा विचार केला असता, आपल्याला कुठून मतदान झाले आणि कुठून कमी झाले याचा विचार न करता भाऊंनी कोणताही भेद न बाळगता कामे केली आहेत. यामुळे कुण्या गावावर वा कुण्या भागावर अन्याय झाल्याचा आरोप एकही जण करू शकत नाही.
हिराभाऊ चौधरी पुढे म्हणाले की, ना. हरीभाऊ जावळे यांनी आजवर आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यात धर्म-जात वा भाग असा कोणताही भेद केला नाही. सर्व समुदायांना समान न्याय या भूमिकेने त्यांची आजवरची वाटचाल राहिली आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण हे माझेच आहे. माझ्यासारख्या यावल तालुक्यात अल्पसंख्य असणार्या समाजातील व्यक्तीला त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या महत्वाच्या सहकारी संस्थेची सोपवलेली धुरा ही याचेच प्रतिक आहे. आजदेखील त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये सर्व जाती-धर्माचे सहकारी असल्याची बाब विसरता येणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे ता राजकारणी नव्हे तर समाजकारणी आहेत. कारण सर्व समाजांचे हित त्यांनी जोपासले आहे. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, काही कुत्सीत मनोवृत्तीच्या लोकांनी कुजबुज सुरू केली आहे. मात्र ज्यांना कुणाला बोलायचे असेल त्यांनी माझ्याशी जाहीर वाद-विवाद करावा. मी ना. हरीभाऊ जावळे यांची सर्वसमावेशकता त्या व्यक्तीसमोर ठामपणे मांडेल. हिंदू व मुस्लीम धर्मीयांना समान न्याय देणारे आणि सर्व बारा बलुतेदारांसह समस्त समाजांना न्याय देणारे व्यक्तीमत्व अर्थात ना. हरीभाऊ जावळे हेच असून मतदार त्यांना भरभरून कौल देतील असा आशावाददेखील हिराभाऊ चौधरी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.