यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिगोंणा येथिल जिल्हा परिषद उर्दु शाळेत आज विद्यार्थांना मोफत पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्तार शेख हे होते. यावेळी विद्यार्थांनां पुस्तक वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुक्तार शेख यांच्या हस्ते करण्यात आली. मागील महामारीच्या संकट काळात शाळेत दोन वर्षा पासुन शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासना संपुर्ण शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले होते. शाळा बंद मुळे विद्यार्थ्यांना पुस्तक मिळाली नव्हती. आज हिंगोणा येथील शाळेत पुस्तक वाटप करण्यात आले. आपल्या शाळा व अभ्यासाकरीता अत्यंत आवश्यक अशी पुस्तके मिळाल्याने शाळेतील विद्यार्थी वर्ग आंनंदीत दिसुन येत होते. आज शाळेत संपन्न झालेल्या कार्यक्रमास हिंगोणा येथील जिल्हा परिषदच्या ऊर्दू शाळेत हाजी युसुफ अली यांनी कोरोनाच्या विषयावर शासनाने दिलेल्या सुचना व मार्गदर्शनासह विदयार्थांनां शैक्षणिक विषयावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अहमद जनाब, अध्यक्ष मुक्तार शेख, सदस्य शब्बीर खान, आसीफ जनाब, मुक्तार जनाब, शाळेचे केंद्र प्रमुख अलीमोहम्मद जनाब, सल्लाउद्दीन जनाब, फारूकी जनाब, तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.