हिंगोणा येथे भीषण पाणी टंचाई

hingona

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा गावात ऐन पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. गेल्या 4 महिन्यापासून गावात पाणी प्रश्न कायम असून आजपर्यंत गावात पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. याकडे ग्रामपंचायत गांभीर्याने लक्ष देत नाही, योग्य ते नियोजन नसल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत ही वर्षाला 35 ते 40 लक्ष एवढे उत्पन्न असुन तरी सुध्दा गावात गेल्या 4 महिन्यापासून पाणी टंचाई कायम आहे. गावाकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. पाणी प्रश्न मिटविण्यासाठी महिलांनी व ग्रामस्थांनी व हिंगोणा मित्र परिवार पुणे, यांनी ग्रामपंचायत येथे हंडा मोर्चा तसेच पंचायत समिती यावल मुख्यकार्यकारी अधिकारी जळगाव, जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिल्यावर सुध्या पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागत नाही आहे त्यातच गावात मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत ४७ लाख रुपये एवढा निधी जलकुंभ व जलवाहिनीसाठी मंजूर झालेला आहे. व त्या कामास सुरुवातही झाली आहे. परंतु गावात नागरिकांनाच पाणी नसल्यामुळे या जलकुंभात पाणी येणार कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेत एक विहीर किंवा ट्युबवेल समाविष्ट करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अशा वेळेवर व भर पावसाळ्यात सुध्या पाणी सुरळीत करण्यासाठी भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी गावातील ग्रामस्थांची बैठक घेऊन तात्काळ 2 पाणी टँकर बोलवले व बेघर प्लॅट जवळील जुनी विहिरीतील गाळ काढण्याचे काम ठेकेदाराला दिले व आज कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली. त्यामुळे गावातील जनता अनिल चौधरी याचे आभार व्यक्त करीत आहे. मात्र जोपर्यंत हिंगोणा गावातील पाणी प्रश्न मिटत नाही तो पर्यंत गावात पाणी टँकर चालूच राहतील असे अनिल चौधरी यांनी यावेळी सांगितले.

Protected Content