चौगाव येथे वृक्षांचा प्रथम वाढदिवस साजरा

chaugav

चोपडा प्रतिनिधी । चौगाव येथील त्रिवेणी मंदिर व विजयगड परिसरात मागील वर्षी दि. 28 जुलै 2018 रोजी तालुक्यातील निसर्ग मित्र समिती मार्फत सुमारे 200 वड व पिंपळाची झाडे लावण्यात आली होती. या झाडांना एकवर्ष पुर्ण झाल्याने काल दि. 28 जुलै रोजी केक कापून झाडांचा प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला.

तसेच नविन वृक्ष लागवड करण्यात आले असून किल्ला संवर्धन करण्यात आले. या प्रसंगी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे सातारा गादीचे 13 वे वंशज विशाल भोसले, उपवन संरक्षक पी.टी.मोरणकर, चोपडा पंचायत समितीचे सभापती आत्माराम म्हळके, वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, वन क्षेत्रपाल पी.बी.पाटील, वनरक्षक के.एल.धनगर, शिवछत्रपती परीवाराचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, अमोल पाटील यांच्यासह संपुर्ण महाराष्ट्रातील मावळे, दुर्गवीर संस्थानचे राहूल पाटील, पंचायत समिती सदस्य बापुराव पाटील, कृषी विस्तार अधिकारी सतिष कोळी, आर.आर.सोनवणे, राजेंद्र ढोडरे, निसर्ग मित्र समितीचे तालुकाध्यक्ष वासु महाजन, जिल्हा सचिव दिनेश बाविस्कर, विश्राम तेले, तालुका संपर्क प्रमुख महेंद्र राजपुत, राहूल गवळी, योगेश कुंभार, पंकज शिंदे, प्रविण देशमुख, पत्रकार आत्माराम पाटील, परेश पालिवाल, संदिप पाटिल, कांतिलाल पाटील, दिपक पाटील व आदी ग्रामस्थ उपस्थीतीत होते.

Protected Content