दाऊदच्या पुतण्याविरोधात ‘मोक्का’नुसार कारवाई

dawood ibrahim nephew rizwan kaskar arrested 696x364

मुंबई, वृत्तसंस्था | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरला ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. एका व्यापाऱ्याकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली त्याला अटकही करण्यात आली आहे.

 

मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच रिझवानला अटक केली होती. देशाबाहेर पळून जात असताना बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. रिझवान हा दाऊदचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरचा मुलगा आहे. अटकेनंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. इकबाल कासकरलाही पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अहमद रझा वडारिया यालाही अटक केली होती. वडारिया हा दाऊद टोळीचा हस्तक फहिम मचमच याचा हस्तक आहे. वडारियाच्या चौकशीत रिझवानचे नाव पुढे आले होते. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रिझवानला अटक केली. अटकेच्या भितीने तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल असल्याने त्याला ‘मोक्का’ लावण्यात आला आहे.

Protected Content