नूतन मराठा हाणामारी : विनोद देशमुख आणि मनोज पाटील पोलीसात हजर

शेअर करा !
7ed5508f 9498 4369 9737 3405c156e2ea
 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात सत्ता संघर्षातून झालेल्या हाणामारी प्रकरणी मार्च २०१८ मध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल होते. याप्रकरणी आज सकाळी विनोद देशमुख व मनोज भास्कर पाटील हे दोघं स्वतःहून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी सकाळी याच गुन्ह्यात अॅड. विजय पाटील यांना अटक करण्यात आली होती.

 

या संदर्भात अधिक असे की, शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात सत्ता संघर्षातून झालेल्या हाणामारी प्रकरणी मार्च २०१८ मध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल होते. यानुसार एका गटाकडून विजय पाटील यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल होता. परंतू या प्रकरणात अटकसत्र झाले नव्हते. तसेच संशयितांनी अटकपूर्व जामीन देखील घेतला नव्हता. काल सकाळी विजय पाटील यांना अटक केल्यानंतर आज सकाळी विनोद देशमुख व मनोज भास्कर पाटील हे दोघं स्वतःहून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हजर झाले. या दोघांना आज दुपारी न्यायालयात हजार करणार असल्याचे कळते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दोघांना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!