ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागल्याने वृद्धेचा मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी । दुचाकीवर मागे बसलेल्या वृद्धेस ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. रविवारी सकाळी १० वाजता खेडीकढोली गावाजवळ हा अपघात घडला. विमलबाई देविदास सपकाळे (वय ६०) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

विमलबाई ह्या त्यांचा भाचा समाधान दगडु सोनवणे याच्या दुचाकीवर बसुन शेताकडे जात होत्या. यावेळी मागुन येणाऱ्या टॅक्टरच्या ट्रॉलीचा त्यांना धक्का लागला. यामुळे त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुचाकीचालक समाधान हा देखील किरकोळ जखमी झाला. या अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पळुन गेला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. मृत विमलबाई यांच्या पश्चात विष्णु व शहर ही दोन मुले, सुन व नातवंड असा परिवार आहे.

Protected Content