मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर दोन वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले असून हे दोन्ही एफआयआर एकत्रित करुन एकच गुन्हा दाखल करावा अशी याचिका राणांनी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका नाकारली आहे..
आज सोमवार, दि. २५ एप्रिल रोजी राणा दाम्पत्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यांच्या वतीनं अॅड. रिझवान मर्चंट तर राज्य सरकारच्या वतीनं अॅड. प्रदीप घरत यांनी यावेळी युक्तीवाद केला.