जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिला पतंजली योग समिती जळगावतर्फे गुरुवार, दि. ४ ऑगस्ट रोजी ‘जडीबुटी दिवस’ आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
चेतना व्यसनमुक्ती केंद्र येथे आयुर्वेदिक रोप व ट्री गार्ड लावून वृक्षरोपण करण्यात आले. येणाऱ्या साधकास आयुर्वेदिक वृक्ष वाटप करण्यात आले. या प्रसंगी महापौर जयश्री महाजन, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते, जिल्हा प्रभारी मनिषा पाटील, मिडियाप्रभारी नेहा जगताप, वृक्ष संवर्धन समितीचे चंद्रशेखर नेवे यांच्या शुभ हस्ते अडुळसा, बेहडा, चिंच, आवळा, जांभूळ, काशीद, करंज, गुलमोहर, पिंपळ व इतर आयुर्वेदिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी योगसाधक रेणुका हिंगु, माधुरी शिंपी, भाग्यश्री महाजन, नूतन तास खेडकर, संगीता चौधरी, प्रा.वाय.एस.बोरसे, प्रतीक सोनार, सागर डेरे, आनंद विसपुते, महेंद्र सपकाळे, राजेंद्र सपकाळे, गणेश गायकवाड, हिम्मत शिरसाट, विजय ठोके, राजेंद्र सोनार व सर्व योगसाधक कार्यकर्ते उपस्थित होते.