निराधार महिलांना ना. गुलाबराव यांच्याहस्ते शासकीय अर्थसहाय्याचे वितरण

dharangaon 1

धरणगाव, प्रतिनिधी | येथील निराधार व वृद्ध महिलांना संजय गांधी, श्रावण बाळ व इंदिरा गांधी वृद्धपकाळ मदत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नेहमीच त्रास होत असतो, मात्र ना. गुलाबराव पाटील यांनी अशा महिलांना त्वरित सहाय्य मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केल. त्यानुसार मंजूर प्रकरणात त्यांनी आज (दि.५) स्वहस्ते धनादेश वितरण केले.

 

या कामी शिवसेना जिल्हा प्रमुख व समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी पुढाकार घेऊन मोलाची मदत करीत अशा महिलांना संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून एकूण २३ महिलांना कुटुंब अर्थ सह्या योजनेचा लाभ मिळवून दिला. या सगळ्यांना प्रत्येकी रुपये २० हजारांचा धनादेश ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. तसेच संजय गांधी निराधार योजनेत धरणगाव शहरात एकूण २००० प्रकरणांना मजुरी देण्यात आली आहे.

आज या योजनेंतर्गत पुढील महिलांना मदत देण्यात आली, सविता सोपान पाटील उखडवाडी, आक्काबाई बापू भिल बोरगाव, भारती संभाजी सोनवणे रेल, लिलाबाई राजाराम लोंढे प्रिंप्री, प्रमिला बाई डिगबर कुंभार धरणगाव, संगीता बाई भिका रोकडे धानोरा, मंगला बाई शांताराम कोळी वाकटूकी, कामिनी बाई भिका चौधरी झुरखेडा, अशा दिलीप सोनवणे हिंगोणे, मीराबाई छोटू बागले झुरखेडा, बेबाबाई भावलाल कोळी नांदेड, मिनाबाई मुरलीधर साळुंखे पाळधी खु, सुनंदा बाई रमेश पाटील आव्हाणे, सीमा रोहिदास पाटील गारखेडा, केसरबी महम्मद बागवान प्रिंप्री, मीराबाई वासुदेव भोई वराड, नंदा योगेश चव्हाण बभोरी बु, सुषमा तुकाराम भिल कल्याणे खु, उषा एकनाथ भिल बोरगाव, प्रियंका अशोक चौधरी धरणगाव, प्रमिला ज्ञानेश्वर महाजन धरणगाव, सुनंदा जगतराव पाटील टाहकळी खु, कुसुम भगवान चव्हाण झुरखेडा.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, तहसीलदार नितीनकुमार देवरे, श्री. गायधनी, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील सुरेश चौधरी, उपनगराध्यक्ष अंजली विसावे, माजी उपनगराध्यक्ष देविदास महाजन व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले.

Protected Content