सावद्यात पत्रकारांच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांना मदत (व्हिडिओ)

सावदा : जितेंद्र कुलकर्णी । येथील ताप्ती सातपुडा पत्रकार फाउंडेशनच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांना मदत करत पाणी साठवण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली.  

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आणि तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधी  शमीभा  पत्रकारांचे आभार मानताना म्हणाल्या की , या शहरात माझ्या समुदायाचे सुमारे ३५० वर्षांपासून वास्तव्य आहे . २०  हजार लोकसंख्येच्या या शहरात सध्या माझे ८ जणांचे म्हणजे अगदी अल्पसंख्य कुटुंब आहे नेहमी येथील पत्रकार आमच्या संपर्कात असतात विविध विषयांवर आमचे बोलणे होत असते , आठवडाभरापूर्वी आम्ही आमची अडचण त्यांना सांगून पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांना केली होती  पत्रकारांनी लगेच त्यासाठी उद्योजक श्रीराम पाटील यांच्याकडे शब्द टाकला आणि त्यांनीही लगेच आम्हाला पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली ती टाकी आणून बसवून देण्याची व्यवस्था हाजी बाबूशेठ यांनी करून  दिली  . कोरोनाकाळात सध्या सगळेच जगण्यासोबत भाकरीची लढाई लढत आहेत  टाळीवर आधारित आमचीही पोळी थांबलेली आहे स्वतंत्र भारतात आजही आमच्याबद्दल आजही अवघड अशी अस्पृश्यता बाळगली जाते अशी खंत मी नेहमी व्यक्त करीत असते त्यामुळेही अशा कसोटीच्या काळात समाजाकडून आमची घेतली गेलेली दाखल खूप मोलाची वाटते आहे असेही त्या म्हणाल्या.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/380299396590049

 

Protected Content