
चोपडा (प्रतिनिधी) तुम्ही मला एका हाताने मदत करा. मी तुम्हाला दोघं हाताने मदत करेल. तुमचे मतदान स्वरूपाचे कर्ज मी विकास कामाच्या रूपातून परतफेड करेल. जिंकलो तर फक्त मीच आमदार होणार नाही. एवढेच नव्हे तर सर्व मतदार आमदार होणार आहेत,असे प्रतिपादन चोपडा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधतांना केले आहे.
प्रभाकर आप्पा सोनवणे यांचा प्रचार दौरा नुकताच कोळंन्हावी, डाभुर्णी, डोणगाव, उटावद, चिंचोली,किनगाव, आडगाव, कासारखेडा,मालोद, नायगाव, गिरडगाव, वाघोदा आदी गावामध्ये पार पडला. यावेळी कोळन्हावी येथे औनपाचरीक चर्चा करताना मतदारांनी सांगितले की, आम्ही मदत करू यावर प्रभाकर आप्पानी सांगितले की, जिंकलो तर फक्त मीच आमदार होणार नाही. तर सर्व मतदार आमदार होणार आहात, असाच विचार करून माझ्याकडे काम घेऊन यावे. भिलाभाऊंनी या परिसरात अनेक विकास काम केली आहेत. त्यांनी आमदार नसूनही या भागात भरपूर विकास काम केलीत.परंतु भिलाभाऊंचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मला आमदार करून स्वप्न पूर्ण करा, असे भावनिक उदगारही प्रभाकरआप्पा यांनी यावेळी काढले.
यावेळी चोपड्याचे माजी आमदार कैलास बापू पाटील, माजी जि.प.सदस्य शांताराम सपकाळे, ए डी चौधरी, तुकाराम पाटील, प्रकाश रजाळे, सुभाष पाटील, देवेंद्र सोनवणे, गजेंद्र सोनवणे, अरुण वाघ, रविंद्र पाटील, संजय पाटील, टिकाराम चौधरी, कैलास कोळी, हिरालाल साळुंखे, सौ सुनंदा पाटील, मनोहर पाटील, जानिकिराम बाविस्कर भिवराज रायसिंगे, रोहिदास अहिरे, वामन सोनवणे, अण्णा सोळूखे, पद्माकर सोळंके, आण्णा सपकाळे, गौरव सोळंके, सचिन सोळंके, बापू सोळंके, बाळू सोनवणे, राहुल सोनवणे, ईश्वर सोळंके, पूर्वजीत चौधरी, समाधान कोळी, विजय कोळी, जीतेंद्र कोळी, हिरामण कोळी, विनोद कोळी, गोकुळ कोळी, वसंत फालक, यशवंत चौधरी, मुरलीधर कोळी, सुनील कोळी, दिनेश पवार, युवराज कोळी, सचिन कोळी, अरुण पाटील, संजय पाटील, बळीराम पाटील, बाबुलाल पाटील, वाल्मिक पाटील, भानुदास पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल सोळंके, रमेश कोळी, सचिन कोळी ,पवन म्हस्के, शुभम धनगर, समाधान पाटील, विजय पाटील आदी शेकडो कार्यकर्ते प्रचार करत होते.