संत गजानन महाराज संस्थानकडून पूरग्रस्तांना एक कोटी ११ लाखांची मदत

help from shegaon sanstha

खामगाव प्रतिनिधी । शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानकडून कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्तांसाठी एक कोटी ११ लाखांची मदत करण्यात आली असून याचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपुर्द करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेगाव येथे महाजनादेश यात्रेनिमित्ताने आले असता त्यांनी श्री गजानन महाराज मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी संस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त निळकंठदादा पाटील यांनी मुख्यमंत्री तसेच त्यांच्या सोबत आलेल्या अन्य मंत्र्यांचे स्वागत करून शाल श्रीफळ तसेच श्रीचा प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, ना. गिरीश महाजन, बुलडाणा पालकमंत्री ना.डॉ संजय कुटे, ना. डॉ. रणजित पाटील,विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष ना. चैनसुख संचेती, यात्राप्रमुख आ. सुमित ठाकूर, आ. आकाश फुंडकर, बुलडाणा जि.प. अध्यक्ष सौ. तायडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ध्रुपदराव सावळे, जि. प. महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले पाटील,जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख,नंदू अग्रवाल यांच्यासह अन्य स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content