चोपडा येथून पूरग्रस्तांसाठी मदत रवाना

help from chopda
चोपडा प्रतिनिधी । येथील शेतकरी कृती समितीतर्फे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचा समावेश असणारी मदत रवाना करण्यात आली.

चोपडा येथील शेतकरी कृती समिती च्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना एक मोठा ट्रॉला रवाना करण्यात आला. यात साधारणपणे २० ते २२ लाखांचे साहित्य असून यामध्ये ६२५किट होते. यातील प्रत्येक किटमध्ये प्रत्येकात गहू पीठ, गहू, तांदूळ,ज्वारी आदींसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यासोबत स्टोव्ह,भांडे व सतरंजी आदींसह अन्य घटकांचा समावेश होता.

संबंधीत साहित्य येलूर, तुंगा, आष्टा,इस्लामपूर,पलूस भागाच्या जवळ असलेल्या गावांमध्ये आधी सर्वे करून नंतर वाटण्यात आले. त्यासाठी तेथे किरण पाटील(इस्लामपूर,)बाळासाहेब जाधव(येलूर,वाळवा)अनिल जाधव(तुंग),संजीव माने(आष्टा), (पलूस)यांनी मेहनत घेतली. यावेळी चोपड्याहून शेतकरी कृती समिती चे संजीव बाविस्कर, रमाकांत सोनवणे,अनिल पाटील,नितीन पाटील,जितू पाटील,कुलदीप पाटील,विपिन बोरोले,सागर पाटील, निरंजन पाटील, जितेंद्र निकम हे गेले होते.

व्हाटसअ‍ॅपवर मदतीचे आवाहन करून हे सर्व साहित्य जमा करण्यात आले. यासाठी तहसीलदार अनिल जी गावित,माजी आमदार डॉ सुरेश दादा पाटील,डॉ दीपक पाटील,डॉ दिलीप पाटील,विश्‍वजित पाटील,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड संदीप भय्या पाटील, डॉ सुरेश बोरोले, घनश्याम अग्रवाल, माजी आमदार कैलास पाटील,पंकज बोरोले,चंद्रशेखर पाटील, जि. प. सभापती दिलीप पाटील,नरेंद्र पाटील,संदीप पाटील, शांताराम पाटील, प्रकाश पाटील, डॉ पराग पाटील,भागवत महाजन,डॉ रवींद्र निकम व नितीन निकम,गुलाब पाटील, राजाराम पाटील(तावसे),वैभव पाटील (घुमावल),दत्तात्रय पाटील(खड्गाव),प्रफ्फुल राजपूत(विरवाडे),डॉ गुरुप्रसाद व वर्षा वाघ,डॉ अमोल पाटील,डॉ अतुल पाटील,डॉ मनोज पाटील,डॉ स्नेहल भामरे,विजय पाटील,डॉ रोहन पाटील,मिथुन पाटील,कीर्ती महाजन, अमृत वाघ, भरत महाजन, किशोर महाजन,महाले सर,ए म. व्ही. पाटील,डॉ सुभाष देसाई,डॉ रवींद्र पाटील,जयश्री चव्हाण,एन एस सोनवणे, नारायण बोरोले,मयूर बोरोले, कचवे सर,प्रा प्रदीप पाटील,प्राचार्य सूर्यवंशी,पंकज समूह,महात्मागांधी शिक्षण मंडळ, शारदा क्लास, ब्रिलीयंट क्लास,प्रा रमेश वाघजले व त्यांचे विद्यार्थी,पँकजनगर मधील सारे महिला मंडळ,ईंनरव्हील क्लुब,इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे प्रवीण गुजराथी,मुन्ना सोमाणी(चोपडा), किरणसिंग राजपूत,सदाशिव पाटील व डॉ अप्पा पाटील, जितेंद्र पाटील(कुसुम्बा),विजय रजाळे(घोडगाव),जगदीश बोरसे व मित्र परिवार,जैन भाऊ (वेळोदे),डॉ अजय करंदीकर व डॉ राजेंद्र सोनवणे(गणपुर),रमेश सोनवणे व विजय बाविस्कर(हातेड),वसंत पाटील (धुपे),प्रशांत पाटील,नारायन पाटील,उदय पाटील,डॉ पराग पाटील,(चहार्डी),अनिल बाविस्कर,बी जी महाजन व सहकारी (चुंचाळे) यांचेसह असंख्य ज्ञात अज्ञात व्यक्तीनी सहकार्य केले तर पवन अग्रवाल,धीरज अमित जैन, अग्रवाल (अडावद),राजू शेट ओम ट्रेडिंग ,हमाल बंधू यांनी मदत केली.

दरम्यान, मदत रवाना होत असतांना अनिल वानखेडे,सुरेश पाटील,शशी देवरे,सुशील टातीया,मधुकर बाविस्कर, धनंजय पाटील,के डी चौधरी यांचेसह शेकडो कार्यकर्ते व पत्रकार हजर होते. एस. बी. पाटील यांनी आभार मानले.

Protected Content