बुलडाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे अत्यंत महत्वाचे असून याच अनुषंगाने बुलडाणा येथे नागरीक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेट परिधान करावे याकरिता व्यापक स्वरुपात हेल्मेट संबधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रॅलीची सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांचेकडून रॅलीस हिरवा झेडा दाखविण्यात आला. तसेच सेल्फी पॉईटवर फोटो काढून हेल्मेट बाबत जनजागृती करण्यात आली. सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, जयस्तंभ चौक, धाड नाका, सरकुलर रोड, चिखली रोड, भोडे चौक, बाजार लाईनमार्गे काढण्यात आली. रॅलीचा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलडाणा येथे समारोप करण्यात आला.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आज बुधवार, दि.४ एप्रिल रोजी शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त आलेले नागरीक तसेच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांना दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापरण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार तसेच बुलडाणा शहर पोलीस निरिक्षक प्रल्हाद काटकर यांनीपरिवहन कार्यालयात कामकाज निमीत आलेल्या नागरीक व कार्यालयीन कर्मचारी यांना प्रबोधन केले.
वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे व बहुतांशी दुचाकी वाहनाच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे. या बाबत हेल्मेट वापरण्यासंबधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी संबधी व्यापक जनजागृती करीता संपूर्ण शहरामध्ये हेल्मेट रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये परिवहन विभाग अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, वाहन वितरक प्रतिनिधी सहभागी झाले होते.