मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर १ मार्चला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालय करणार की ती उच्च न्यायालयात होणार, हे त्यानंतरच स्पष्ट होईल.
शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेबाबत १० जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची ही याचिका सोमवारी न्यायालयासमोर आली होती. त्या वेळी या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातच व्हावी, असा आग्रह ठाकरे गटाच्या वकिलांनी धरला होता, तर याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आधीच याचिका दाखल असल्याने तिथेच सुनावणी व्हावी, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली होती.