जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट परिसरात बाजार खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, कल्पना दिनकर पाटील वय ४० रा. दत्त कॉलनी जळगाव या महिला आपल्या परविारासह वास्तव्याला आहे. सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कल्पना पाटील या केळकर मार्केटच्या गल्लीतून फुले मार्केटकडे जात होत्या. त्यावेळी अचानक कोणीतरी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने मंगलपोतचा सर्वत्र शोध घेतला, मात्र पोत न सापडल्याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे करत आहेत.