जळगाव प्रतिनिधी । जळगाव बसस्थानकातून न्यायालयीन कर्मचाऱ्याचा १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, चंद्रवदन वसंतराव भारंबे (वय-३१) रा. दिपाली नगर जलम रोड खामगाव हे ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास जळगावातील नवीन बसस्थानकात असतांना त्यांच्या १३ हजार रूपये किंमतीचा मेाबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडली. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील करीत आहे.