‘त्या’ आमदारांच्या अपात्रतेवर ११ जुलै रोजीच होणार सुनावणी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर तातडीने सुनावणी घ्यावी, या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

काल रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोरांवर अपात्रतेबाबत ११ जुलै रोजी होणारी सुनावणी ही आजच तातडीने घेण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू हे सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यांनी विश्‍वासदर्शक ठरावावर स्थगिती आणण्यासह अपात्रतेवर आजच सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. यासोबत काल झालेल्या शपथविधीच्या विरोधातही याचिका दाखल करण्यात आली होती.

यावर सुप्रीम कोर्टाने अपात्रतेबाबत ११ जुलै रोजीच सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केले. यामुळे आता विधानसभाध्यक्ष निवड आणि बहुमतासाठी दाखल करण्यात येणार्‍या विश्‍वासदर्शक ठरावाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, विधानसेचे विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार असून यात पहिल्या दिवशी विधानसभाध्यक्षांची निवड तर दुसर्‍या दिवशी म्हणजेच ४ जुलै रोजी विश्‍वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे.

Protected Content