महाजनच एकदा म्हटले होते…अरे त्या ‘चंपा’ला फोन लाव !

 

धुळे (प्रतिनिधी) एक वेळेस गिरीश महाजनांच्या कार्यालयात बसलो असतांना त्यांनी अरे त्या ‘चंपा’ला फोन लाव असा उल्लेख केल्याचे मी ऐकले आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना “चंपा’ म्हटले जाते; हे वाईट वाटते. पण “चंपा’ हे नाव गिरीष महाजनांनीच ठेवले हे चंद्रकांत पाटील यांना माहित नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना “टरबुज्या’ म्हणत असल्याचे देखील गोटे यांनी म्हटले आहे.

 

अनिल गोटे यांनी 27 जूनला पुन्हा एक पत्रक काढले असून यात त्यांनी म्हटले आहे, भाजपमधील नेत्यांचे नाव बदलविण्याची संधी त्यांच्याच पक्षातील नेतेच देत नाही. आपापसातील व्देष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण केले आहे. देवेंद्र फडणवीसांना भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना “टरबुज्या’ म्हणत असल्याचे देखील गोटे यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे. नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पध्दत भाजपमध्ये आहे. कारण नरेंद्र मोदी यांना “नमो’, अमित शाहांना “मोटाभाई’ म्हणून संबोधले जाते. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना देखील “चंपा’ म्हणत असावेत. असे आपले मत असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी म्हणत भाजपवर टीका केली आहे. तसेच भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर वयाच्या टीकेला देखील गोटे यांनी उत्तर दिले आहे. समुद्र किनारी जावून तोकड्या चड्ड्यांमध्ये फोटो सेशन केले. राहुल महाजनच्या समवेत महिलेशी केलेल्या वर्तनावर वयाचे मुल्यमापन करायचे का? हे राम कदमांची लक्षात घ्यावे, असे गोटे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Protected Content