
ब्रिटन (वृत्तसंस्था) पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरारी झालेल्या नीरव मोदीला ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात अटक करण्य़ात आली होती. आज त्याच्या जामीनअर्जावर तेथील न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, या सुनावणी ब्रिटनमध्ये गेलेल्या तपास अधिकाऱ्याची ईडीने बदली केली आहे. ईडीच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.
नीरव मोदी विरोधात ब्रिटनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. गेल्या 9 दिवसांपासून नीरव तुरुंगात होता. न्यायालयात भारताकडून टोबी कॅडमन प्रतिनिधीत्व करत आहेत. तर दुसरीकडे नीरव आणि मल्ल्या यांच्या तपासावर निरिक्षक असलेले सहाय्यक संचालक सत्यव्रत कुमार याच्या बदलीचा आदेश आज ईडीने काढला आहे. विशेष नीरव मोदीवरील सुनावणीसाठी ते सध्या लंडनमध्ये गेले असून ते वेस्टिमिंस्टर न्यायालयात उपस्थित आहेत. न्यायालयात पोहचलेल्या भारताच्या ईडी आणि सीबीआय अधिकाऱ्यांच्या टीमकडे मोदीविरोधात पुरावे आहेत.तसेच भारतीय वकिलाने नीरव मोदीचा जामिन नाकारण्यासाठी विविध कारणे दिली आहेत. त्यात निरव मोदी जामिनावर सुटल्यास पुराव्यांशी छेडछाड करेल आणि साक्षीदारांनाही धमकावेल, असा आरोप केला आहे.