यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील आरोग्य उप केंद्राव्दारे ० ते ६ वर्ष वयापर्यंतच्या बालकांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्यात.
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत थोरगव्हाण उपकेद्रात ० ते ६ वर्षे वयोगटातील लहान बालकांना जंतनाशक गोळ्या वाटप मोहीमेचे शुभारंभ साकळी प्राथमिक आरोग्य केद्रातील डॉ. स्वाती कवडीवाले यांचाहस्ते गोळ्या वाटप करून करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप घरोघरी करण्यात येणार असल्याची माहीती आरोग्य सुत्रांकडुन मिळाली असुन १ मार्च हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून संपुर्ण देशासह राज्यात साजरा केला जातो, याचे औचित्य साधून आरोग्य विभागातर्फे परिसरातील सर्व शाळा आणि अंगणवाड्या येथे जाऊन १ ते १९वयोगटांतील सर्व मुलांना गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
मनवेल येथे आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ, आशा सेविका रंजना कोळी, पुनम पाटील तर थोरगव्हाण उप केद्रातील सी.एच.ओ.डाँ गाजाला, पो.पा.गजानन चौधरी, आरोग्य सेवक एम पी.निकुंभ, आरोग्य सेविका सविता कोळी आशा स्वंयमसेविका निर्जला सोनवणे उपस्थित होते.