पाच लाखासाठी विवाहितेचा पतीसह सासूकडून छळ

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील माहेर असलेल्या विवाहितेला पाच लाखासाठी पतीसह सासूकडून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात पतीसह सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शहरातील महाजन गल्ली येथील माहेर असलेल्या सोनाली संदीप गुरव (वय-२५) यांचा विवाह नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील संदीप रतिलाल गुरव यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या सुरुवातीचे एक वर्ष चांगले गेल्यानंतर त्यांच्या संसारवेलीवर मुलगी झाली. दरम्यान मुलगी झाल्याची नाराजी व्यक्त करत पतीने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरवात केली.

त्यानंतर सासूने दमदाटी केली. “माहेरहून टेलरिंग दुकान टाकण्यासाठी ५ लाख रुपये आणावे तरच तुला मी नांदवेल.” असे सांगून मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता यावल येथील माहेरी निघून आल्या.

रविवार, दि. १० एप्रिल रोजी त्यांनी या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती संदीप रतिलाल गुरव, सासू लताबाई रतिलाल गुरव यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास असलम खान करीत आहे.

Protected Content