टोके शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

9d0afe4c cdc8 4e87 ab20 ef985b555d67

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शारदा कॉलनी, महाबळ परीसरातील महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, जळगाव संचलित श्रीमती शेवंताबाई खेमा टोके प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन व राष्ट्र सेवा समिती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थ्यांची नुकतीच सर्व प्रकारची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

 

या प्रसंगी आयएमए व राष्ट्र सेवा समिती कडून जंतूनाशक, कॅल्शियम तसेच रक्तवर्धक गोळ्या, टॉनिक ची बाटली, साबण, नेलकटर या व्यतिरीक्त गरजेनुसार आवश्यक औषधी तर आयडीए कडून टुथब्रश, टुथपेस्ट देऊन दातांची योग्य निगा राखण्यासंबंधी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

 

डाॅ जयंती चौधरी यांनी मुलांना स्वच्छतेविषयी आणि आहाराविषयक मार्गदर्शन करून  ‘ हमको मन की शक्ती देना ’ हे गीत म्हणून दाखविले.त्यानंतर या संघटनांच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. याप्रसंगी आयएमए चे सचिव डॉ धर्मेंद्र पाटील, डॉ पराग चौधरी, डॉ जयंती चौधरी, डॉ मनजित संघवी, डॉ मृणालिनी पाटील, डॉ गौरव महाजन, डॉ नितीन धांडे, डॉ जितेंद्र नारखेडे .आयडीए चे डाॅ मेघना नारखेडे, डॉ सागर चौधरी, डॉ रेणूका चौधरी तर राष्ट सेवा समिती च्या संगिता अट्रावलकर व उज्वलाताई बेंडाळे यांनी सेवा बजावली. या शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ संजय पाटील, देविदास बाविस्कर, आकाश मराठे व गोवर्धन भंगाळे तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content