हाथरसचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक निलंबीत

लखनऊ । हाथरस येथील पिडीतेच्या प्रकरणावरून देशात उद्रेक झाला असतांना उत्तरप्रदेश सरकारने अखेर जिल्हाधिकारी प्रवीण कुमार आणि जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांना निलंबीत केले आहे.

हाथरस येथील प्रकरणामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. उत्तरप्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. यातच प्रशासकीय पातळीवरून हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न उघड झाल्याने जनमानस संतप्त झाले आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून या प्रकरणी दोषींना कठोर दंड मिळेल असे नमूद केले आहे.

यानंतर काही तासांनीच हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार आणि जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांना निलंबीत करण्यात आले आहे. या दोन्हींसह एकूण सात जणांचे निलंबन करण्यात आले आहे. तर या प्रकरणातील सर्व आरोपींची पॉलिग्राफ चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.

Protected Content