‘हस्तकला प्रदर्शन’ हे स्त्रीशक्तीला प्रज्वलित करते – किरण बेंडाळे (व्हिडीओ)

bendale

जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात करियर गाईडन्स कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट समितीतर्फे दोन दिवशी हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन लेवा एज्युकेशन युनियन संचालक किरण बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले असून ते म्हणाले की, प्रदर्शनी ही इंद्रधनुष्याची छटा पाहिल्यासारखे वाटत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तु वाखाणण्याजोग्या असून त्या यामागे विद्यार्थिनींची प्रचंड मेहनत आहे. तसेच ही प्रदर्शनी जळगावपर्यंतच न राहता ते राष्ट्रीय स्तरावर पोहोचली पाहिजे. कारण ही प्रदर्शने स्त्रीशक्ती प्रज्वलित करणारी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी आहे. असे सांगून त्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिला आहेत. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य पी.पी.सावखेडकर, समिती प्रमुख आर.आर.ठोसरे, प्राचार्य एस.एस.राणे उपस्थित होते.

या प्रदर्शनात एकुण 62 स्टॉल्स विद्यार्थिनींनी लावलेले असून यामध्ये ज्वेलरी, पेटिंग्स, वॉलपीस, शो-पिस, पुजाथाली, मायक्रमच्या वस्तू, म्युरल, क्रिस्टल, फ्लॉवरपीस इलेक्ट्रॉनिक्स सजावटीच्या वस्तु, विविध खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, विविध प्रकारच्या साड्या, ड्रेस, वर्क केलेल्या शोभिवंत वस्तु तसेच यांसारखे विविध वस्तु प्रदर्शनीत विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा हा महाविद्यालयाचा उद्देश आहे. शहरवासियांनी पण या प्रदर्शनात उत्तम प्रतिसाद देऊन विद्यार्थिंनीचा उत्साह वाढवण्यात आला असून आज रोजी हस्तकला प्रदर्शनाचे सायंकाळी 8 वाजता समारोप करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार बी.के.साखळे यांनी केले आहे.

Protected Content