फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । आदिवासी तडवी भिल्ल समाजातील जात पडताळणीसाठी ना.हरीभाऊ जावळे यांनी पाठपुरावा करुन मदत केल्यामुळे रावेर व यावल तालुक्यातील तडवी भिल्ल समाजबांधवांनी त्यांचा सत्कार केला.
पुर्वी तडवी भिल्ल (८ ) जात पडताळणी व्हायची आता काही वर्षांपासून ती बंद झाल्याने समाजाला अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते. ना.हरीभाऊ जावळे यानी या संदर्भात आदिवासी विकास विभाग,प्रधान सचिव, आदिवासी मंत्री यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करुन या विषया संदर्भात या समाजाला न्याय देण्याचे काम केले. याच भुमीकेचे कौतुक आणि आभार म्हणून आज रावेर यावल तालुक्यातील समस्त तडवी भिल्ल समाजाने त्यांचा भव्य सत्कार फैजपूर येथे केला.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती अहमद जबरा, आदिवासी प्रकल्प प्रमुख मिना तडवी,ग्राम पंचायत सदस्य आलिशान तडवी आणि समस्त यावल रावेर तालुक्यातील तडवी भिल्ल समाजातील बांधव उपस्थित होते.