पैशांसाठी विवाहितेचा छळ व जीवेठार मारण्याची धमकी !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील माहेर असलेल्या विवाहितेला ईलेक्ट्रीक दुकान टाकण्यासाठी १ लाख रूपयांची मागणी करत कोपरगाव येथील सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील माहेर असलेल्या सिमा संविधान सोनवणे वय २८ यांचा विवाह अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संविधान प्रल्हाद सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती संविधान सोनवणे याने विवाहितेला इलेक्ट्रीक दुकान टाकण्यासाठी माहेराहून १ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. त्यानंतर विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिचा छळ करण्यास सुरूवात केली. तसेच पैसे आणले नाही तर विष देवून मारून टाकण्याची धमकी दिली. शिवाय सासू सासरे यांनी देखील पैशांसाठी विवाहितेला छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी शिंदी येथे निघून आल्या. सोमवारी १८ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता चाळीसगाव ग्रामीण पाोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पती संविधान प्रल्हाद सोनवणे, सासरे प्रल्हाद धाकु सोनवणे आणि सासु लक्ष्मीबाई प्रल्हाद सोनवणे सर्व रा. कोपरगाव जि. अहमदनगर यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण संगेले हे करीत आहे.

Protected Content