रामेश्वर कॉलनीतील विवाहितेचा तीन लाखांसाठी छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या विवाहितेला घर घेण्याकामी माहेरहून ३ लाख रूपये आणावे यासाठी मारहाण व छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.  याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहीर असलेल्या रूपाली प्रशांत पाटील (वय-२४) विवाह चोपडा तालुक्यातील तावसे खुर्द येथील प्रशांत जगन्नाथ पाटील यांच्याशी २ जोनवारी २०१८ रोजी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती प्रशांत पाटील यांनी पुण्यात घर घेण्यासाठी ३ लाख रुपये माहेरहुन आणावे यासाठी अशी मागणी केली. परंतु विवाहितेने पैसे न आणल्याने रागातून पतीने तिला मारहाण करून छळ करण्यास सुरूवात केली. पैशांसाठी तिचे सासू, जेठ आणि जेठाणी यांनी देखील पैशांची मागणी केली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी रामेश्वर कॉलनी निघून आल्या. त्यानंतर शुक्रवारी १५ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता  एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती प्रशांत जगन्नाथ पाटील, सासू निलाबाई जगन्नाथ पाटील, जेठ वसंत जगन्नाथ पाटील आणि जेठाणी पूनम वसंत पाटील सर्व रा. तावसे खुर्द ता.चोपडा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.

 

Protected Content