जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील श्रीरत्न कॉलनीत राहणाऱ्या विवाहितेला माहेराहून चारचाकी घेण्यासाठी ५ लाख रूपये आणावे अशी मागणी करत मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पतीसह सासरच्या मंडळींविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील श्रीरत्न कॉलनीतील माहेर आणि सासर आलेल्या ज्योती मंगेश पाटील वय २८ यांचा विवाह मंगेश राजेंद्र पाटील यांच्याशी समाजाच्या रितीरिवाजानुसार जून २०१८ मध्ये झालेला आहे. लग्नानंतर काही महिने चांगले गेल्यानंतर विवाहितला किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर चारचाकी घेण्यासाठी माहेराहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. परंतू विवाहितेने पैसे आणले नाही, याचा राग आल्याने पती मंगेश पाटील याने शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर तिचे सासरच्या मंडळींनी देखील तिचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. रविवारी १४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मंगेश राजेंद्र पाटील, सासरे राजेंद्र वसंत पाटील, सासू साधना राजेंद्र पाटील, दिर श्यामकांत राजेंद्र पाटील, दिराणी मनिषा शामकांत पाटील सर्व रा. श्रीरत्न कॉलनी, जळगाव तसचे प्रमिला दिपक पाटील आणि दिपक अजबराव पाटील सर्व रा. पाचोरा यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.