पाच लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खुबचंद साहित्या टॉवर परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला नोकरी लावण्यासाठी पाच लाखांची मागणी करत सासरी भुसावळातील गांधीनगर येथे शिवीगाळ करत मारहाण करून छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील खुबचंद साहित्य टॉवर परिसरातील माहेर आलेल्या विवाहिता नेहा नितीन मेढे वय २३ यांचा विवाह भुसावळ शहरातील गांधी नगरातील नितीन विजय मेढे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेले आहे. लग्नाच्या चार महिन्यानंतर नोकरी लावण्यासाठी विवाहितेला माहेराहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही. याचा राग आल्याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. पैसे आणले नाही तर तुला वागवणार नाही, तुला मारून टाकेल अशी धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघुन गेल्या. याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती नितीन विजय मेढे, सासरे विजय रघुनाथ मेढे, सासु छाया विजय मेढे, दिर प्रशांत विजय मेढे, नंदोई प्रमोद हरीदास खैरे, नणंद वैशाली प्रमोद खैरे, दिरानी प्रिया प्रशांत मेढे, आणि दिर सचिन विजय मेढे सर्व रा. गांधी नगर, भुसावळ यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहे.
**

Protected Content