पाच लाखांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन ५ लाख घेवून आणण्याची पतीसह सासरच्या लोकांनी मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव येथील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या विवाहितेला १५ जानेवारी २०२२ ते आजपावेतो मानसिक शारिरीक छळ करत तिला मारहाण केली. या जाचाला कंटाळून पिंप्राळा येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली. त्यानुसार पती विनोद मालचे, सासरे हिरामण मालचे, सासू लिलाबाई मालचे, तिन्ही रा. नरवाडा ता.चोपडा तसेच उखबाई भिल रा. घारड ता.चोपडा, पूजा भील रा.वरखेड ता.चोपडा या सासरच्या पाच जणांविरुध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात सोमवार,22 रोजी गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्ससटेबल राजेश चव्हाण हे करीत आहेत.

Protected Content