एरंडोल तालुक्यात गारपीट : फळबागांची मोठी हानी (व्हिडीओ)

utran garpit

एरडोल, प्रतिनिधी | तालुक्यातील उत्राण येथे आज (दि.१२) दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊसासह जोरदार गारपीट झाली. दुपारी ३.०० च्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटून काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. पावसासोबत अचानक गारपीटही सुरु झाली.

 

त्यात जवखेडे,अंतुर्ली,तळई यागावांत मुसळधार पाऊस तर लिंबू आणि पेरुसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्राण परिसरात १० मिनिटे पाऊस व जोरदार गारपीट झाली. परिसरातील लिंब व पेरू बागांचे तसेच दादर, हरबरा व गहु यांचेही मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत एरंडोल पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन यांनी तत्काळ प्रशासनाने या लिंबू बागांचे व पिकांचे पंचनामे करून शेतक-यांना मदत द्यावी असे आवाहन केले आहे.

 

 

Protected Content