जळगावात ४ लाखाचा गुटखा जप्त ; एकावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव आरोग्यास हानीकारक असलेला पानमसाला, तंबाखू, सुगंधित सुपारी यांच्या विक्री, साठवणुकीस बंद असताना त्याची साठवणूक केलेल्या दुकानावर कारवाई करत चार लाख १७ हजारांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई मानसिंग मार्केटमधील पंकज ट्रेडर्स या दुकानावर सोमवार १० जून रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आली. या प्रकरणी मंगळवारी ११ जून रोजी दुपारी ४ वाजता दुकानमालक भरत विनायक बाविस्कर (४३, रा. पिंप्राळ रोड) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसिंग मार्केटमध्ये प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू, सुगंधित सुपारी विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार पथक पंकज ट्रेडर्स या दुकानावर सोमवार १० जून रोजी सायंकाळी ७ वाजता पोहचले. तेथे दुकानात पानमसाला, तंबाखू, सुपारी यांचे पाकीट आढळून आले. त्यांची किंमत चार लाख १७ हजार रूपये अशी असून याचे नमुने घेऊन साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मंगळवारी ११ जून रोजी दुपारी ४ वाजता पंकज ट्रेडर्स या दुकानचे मालक भरत बाविस्कर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content