मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे येणाऱ्या कारमधून गुटख्याची सुरू असलेली वाहतूक मुक्ताईनगर
पोलिसांनी हाणून पाडली. या कारवाईत ३ लाख ९ हजारांचा गुटखा व कार मिळून एकूण ८ लाख
२९ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास झाली. हवालदार विनोद सोनवणे यांना
कारमधून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार कार (क्रं.एमपी.६८-झेडए.९ ८६२) ला मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात पकडून तपासणी करण्यात आली. त्यात गुटखा आढळला. शेख अबिद शेख जहीर (वय ३०, रा. राजघाट, काली मशिदजवळ, बऱ्हाणपूर) याला अटक केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.