मुक्ताईनगरात गुटखा जप्त : पुन्हा धडक कारवाई

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंप्रीअकाराऊत गावाजवळ अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत तब्बल १८ लक्ष रूपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त करण्याच्या घटना घडत आहेत. याच प्रकारे पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासनाने तब्बल १८ लाख रूपयांचा प्रतिबंधीत गुटखा वाहून नेणारे वाहन जप्त केले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासन खात्याचे अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र भरकड यांना पिंप्रीअकाराऊत गावाजवळ असलेल्या सार्वजनीक ठिकाणी एका वाहनातून छत्रपती संभाजी महाराज नगर येथे प्रतिबंधीत गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी कारवाई करून महेंद्रा बोलेरे हे वाहन जप्त केले. यात प्रतिबंध असलेल्या उत्पादनांसह बोलेरे वाहन जप्त करण्यात आले असून याचे एकत्रीत मूल्य सुमारे १८ लाख ३ हजार ६०० रूपये इतके आहे.

दरम्यान, या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा १८८, २७२, २७३, ३२८ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील २६ (२) (४); २७ (३) (डी); २७ (३) (ई) व ५९ अन्वये नोंदविण्यात आला आहे. यातील संशयितांमध्ये वाहन चालक सचिन भिमराव कोलते ( तरा. हर्सूल, छत्रपती संभाजी महाराज नगर ); क्लीनर सुभाष रंगनाथ कनासे; वाहन मालक गजानन बाबासाहेब लेंभे, जावेदभाई व सोहेल हबीब ( सर्व रा. छत्रपती संभाजी महाराज नगर ) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे आणि हवालदार संतोष चौधरी हे करीत आहेत.

Protected Content