वरणगावात गुटखा पुरवणारी टोळी सक्रिय !

वरणगाव प्रतिनिधी । महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा बंदी असतांना वरणगाव येथे गेल्या महिन्याभरात पोलिसांनी विमल गुटखा पुरवठा धारकांवर तिसरी कारवाई केली असुन शहरात खुलेआम गुटखा माफियांचे रॅकेट सक्रीय झाले आहे. त्यामुळे पोलिसांना खुले आव्हान दिल्याची भावना आहे. यावर कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी सुज्ञांनी केली आहे.

एकीकडे कोरोनाचा  संसर्ग  वाढत असून शासनाकडून निर्बध कडक केले जात आहेत त्याच अनुशंगाने प्रशिक्षीत डिवायएसपी नितीन गणापूरे यांनी शहरांतील विविध भागांमध्ये गस्त वाढविली आहे असेच गस्तीवर असतांना पोलिस कर्मचारी योगेश जोशी यांना रविवारी रात्री प्रतिभा नगरातील खाजगी रुग्णालयाच्या  मागे शेख शोएब खाटिक उर्फ  डिके ३५ रा प्रतिभा नगर वरणगाव यांच्या मालकिच्या मालवाहू अॅपेरीक्षा क्रमांक एम.एच १९ एस.६६७३ मधे बेकायदा गुटखा वाहतूक करीत असतांना मिळून आला .वरणगाव पोलिसांनी  सदर घटनेची नोंद घेऊन संशयीताला वाहन व मुद्देमालासह ताब्यात घेतले . व अन्न .औषध विभाग जळगाव येथिल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला . परंतु कोरोना संसर्गामूळे शासकिय नियमांचे व कामकाजात व्यस्त चे कारण देत नकार दर्शविल्याचे समजते . त्यामुळे वरणगाव पोलिस स्टेशन मधील पो .कॉ. योगेश जोशी यांनी फिर्याद देऊन दि .२० सोमवार रोजी गुन्हा दाखल केला असून संशयीत शोएब खाटिक वय ३५ याला ताब्यात घेतले. 

सुमारे दोन  लाख ३४ हजार ४२० किमतीच्या तंबाखुचे पाऊच व एक लहान गोणी त्यामध्ये ५२ पाकिटे प्रत्येक पाकिटामध्ये २२ पाऊच आपल्या स्वताचे फायदयासाठी अवैधरित्या विना परवांना महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले सुंगधीत विमल पानमसाला व्ही वन तंबाखु  इ . माला ताब्यात घेतला आहे . हे तंबाखूजन्य पदार्थ  मानवी जीव नास घातक आहे यांची जाणीव असून सुध्दा कायदयाची तमा न बाळगता स्वतःच्या आर्थीक फायदयासाठी  वाहतुक करतांना मिळून आल्याने संशयीता विरुध्द कलम ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढिल  तपास डीवायएसपी . नितीन गणापुरे करीत आहे .

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.