जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | के. सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते महर्षी व्यास ऋषींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रसंगी योगेश भालेराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यावर आधारित सुंदर असे गुर ब्रम्हा गुरुर्विष्णु … या गीतावर सुंदर असे नृत्य सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य ची महिमा आपल्या भाषणातून व नाटिकांमधून सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक सूर्यकांत पाटील, भावना पाटील, तेजस्विनी महाजन, यांनी केले तर कल्पना तायडे सुधीर वाणी तसेच सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.