धरणगाव प्रतिनिधी । सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना ३८,१०६ मतांची निर्णायक आघाडी मिळाली असून त्यांचा विजय निश्चित झाला आहे.
ना. गुलाबराव पाटील यांनी अगदी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. यानंतर प्रत्येक फेरीनंतर त्यांचे मताधिक्य वाढत गेले. त्यांना ३८,१०६ मतांची निर्णायक आघाडी मिळाली असून त्यांचा विजय निश्चित झालेला आहे. याबाबत दुपारी उशीरा अधिकृत निकाल जाहीर करण्यात येणार आहे.