चाळीसगावातील हॅकिंग अफवा

jc8kolng evm and vvpat 625x300 20 March 19

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथे मतमोजणी केंद्राबाहेर मतमोजणी यंत्र हॅक केल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर प्रसारीत होत आहे. दरम्यान, याबाबत असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केल्याने मतमोजणी यंत्र हॅकिंग ही एक अफवा ठरली आहे.

चाळीसगाव येथे मतमोजणी यंत्र हॅक याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी श्री. साताळकर यांनी खुलासा केला आहे की, असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. याबाबत ज्या उमेदवारांने संशय व्यक्त केला होता. त्यांना सर्व परिस्थिती अवगत करण्यात आली आहे. उमेदवारांचे समाधान झाले असून आता त्यांची काहीही तक्रार नसल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी श्री. साताळकर यांनी सांगितले आहे.कृपया कोणीही अफवा पसरवू नये. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Protected Content