बिहारच्या रणांगणात धडाडणार खान्देशची मुलूख मैदानी तोफ !

जळगाव प्रतिनिधी । बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे. यामुळे ‘खान्देशची मुलूख मैदानी तोफ’ आता बिहारच्या रणांगणात धडाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. यात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे.

या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सुभाष देसाइ; खा. संजय राऊत; चंद्रकांत खैरे
, अनिल देसाई,विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी व अशोक तिवारी यांचा समावेश आहे. शिवसेना बिहार विधानसभा निवडणुकीत ५० जागा लढवणार आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे.

ना. गुलाबराव पाटील यांना अलीकडेच शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यातच आता ते बिहारमधील स्टार प्रचारक झाले आहेत. यामुळे आता खान्देशची मुलूख मैदानी तोफ ही बिहारमध्ये धडाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content