धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिवसेनेच्या महाराष्ट्र उपनेतेपदी नुकतीच निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा मुंबई येथील कार्यालयात सत्कार करण्यात आला.
त्यांच्या निवडीबद्दल मुक्ताईनगरचे आमदार चद्रकांत पाटील, मुक्ताईनगरचे दिलीप पाटील, जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष मराठा फाउंडेशन माजी नगराध्यक्ष, भवरलाल जैन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र दिव्यांग महासंघाचे अध्यक्ष पी.एम.पाटील, जळगाव विभाग प्रमुख विलास चौधरी,जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज चौधरी, गोविंद पाटील, मोती पाटील आदींनी मुंबई येथील कार्यालयात माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार केला.