ठाकरे सरकारवर किरीट सोमैय्यांचे पुन्हा गंभीर आरोप

 

मुंबई : वृत्तसंस्था । ठाकरे सरकारकडून इंग्रजांच्या काळातील ९९ वर्ष करारावर देण्यात आलेल्या जमिनी ९९९ वर्ष करण्यात आल्या. महाकाली मातेला विकण्यासाठी आणि या लेण्या बिल्डर्सला दान करण्यासाठी ही कालमर्यादा ९९९ केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. त्यांनी सर्व पुरावे असल्याचाही दावा केला

लेण्या आणि महाकाली मंदिराकडे जाण्याचा रस्ताही आमचाच आहे असं ते म्हणत आहेत. शरद पवारांचे जवळचे आणि ठाकरे परिवारांचे मित्र शाहिद बालवा, अविनाश भोसले, विनोद गोयंका यांच्यावर ठाकरे सरकार मेहेरबान आहे.”

“शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्रावरून महापालिकेने २०० कोटी रुपयांचे टीडीआर दिले आहेत. ठाकरे सरकारनं हायकोर्ट, पुरातत्व विभाग आणि महापालिकेचा निर्णय बाजूला सारत २०० कोटी रूपयांचे डेव्हलपमेंट राईट्स आपल्या बिल्डर्स मित्रांना दिले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आदेशानं २०० कोटी रूपयांचा फायदा बिल्डर्सला दिला जात आहे. या बिल्डर्सला देण्यात आलेला ९९९ वर्षांचं करारपत्र दाखवावंच असं माझं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान आहे,” असंही किरीट सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती देताना आपल्या बेनामी संपत्तीची माहिती लपवली. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. अन्वय नाईक यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे मोठे आर्थिक संबंध आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची २३ हजार ५०० चौरस फूटांची १९ घरं आहेत. ही एकूण ५ . २९ कोटींची बेनामी मालमत्ता आहे.”

Protected Content