भ्रष्ट्राचार प्रकरण; आजी-माजी अधिकाऱ्यांंसह सहा जणांना पुन्हा पोलीस कस्टडी

रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर पंचायत समितीचा बहुचर्चीत शौचालयत भ्रष्ट्राचार प्रकरणी आजी-माजी विस्तार अधिका-यांसह सहा आरोपींना पुन्हा पोलिस कस्टडी वाढवुन मिळाली आहे.तर इतर लेखाधिका-यांसह सहा आरोपींना न्यायालयीन कस्टडी मिळाली आहे.

रावेर पंचायत समितीचा बहुचर्चीत शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणी सर्व बारा आरोपींना आज सहायक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी शितलकुमार नाईक यानी  रावेर न्यायालयात हजर केले असता. रावेर न्यायालयाने गट समन्वयक समाधान निंभोरे सह गट विकास अधिकारी दिपक संदाशिव तत्कालीन विस्तार अधिकारी ग्राम पंचायत दिनकर सोनवणे, विलास सावकारे, महेंद्र गाढे, सतिष पाटील यांना दोन दिवसाची दि २२ पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.

इतर आरोपी लेखाधिकारी लक्ष्मण पाटील,रविंद्र रायपुरे, बाबुराव पाटील नजीर तडवी, रुबाब तडवी, हमीद तडवी यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सहा आरोपींना जळगाव रवाना करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या आर्थिक भ्रष्ट्राचार प्रकरणात अजुन बडे व्यक्ती पोलिस रडारवर असल्याची सुत्रांकडून खात्रीलायक माहिती आहे.

 

Protected Content