राजभवनातील ‘राज’ काय ? सर्वत्र चर्चेला उधाण !

अमळनेर प्रतिनिधी । गुलाबराव देवकर यांनी साहेबराव पाटील यांचे निवासस्थान अर्थात राजभवनात केलेली चर्चा ही राजकीय वर्तुळात गाजत असून याचे ‘राज’ नेमके काय असा खमंग प्रश्‍न आता विचारण्यात येत आहे.

सध्या लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी उमेदवार लोकप्रतिनिधींना भेटून प्रचार प्रसार करण्याचे काम जोरात चालू आहे. या अनुषंगाने आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या राजभवनात जाऊन बंदद्वार चर्चा करून अमळनेर तालुक्यात उलटसुलट चर्चांना ऊत आलेले आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी जर गुलाबराव देवकर यांना मदत केली गुलाबराव देवकरांना लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादी नेते अनिल भाईदास पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील आदी निवडक मान्यवर सोबत होते तब्बल अर्धा तास त्यांनी गुप्तगु चर्चा केली मात्र राजभवनावरचे ‘राज’ मात्र कळू शकले नाही. यावेळी बाहेरचा मोठा
लोखंडी दरवाजा बंद करण्यात आला होता यावेळी कुणालाही प्रवेश दिला गेला नाही इतकेच काय तर पत्रकारांना देखील प्रवेश मिळाला नाही.

माजी आमदार साहेबराव पाटील हे आधी राष्ट्रवादी पक्षात होते त्यामुळे वैयक्तिक संबंध म्हणून आपण त्याठिकाणी जाऊन भेट घेतली असे नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवकर आप्पा यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. गुलाबराव देवकर यांना भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा होण्याची शक्यता असून जनतेमध्ये अशीच खमंग चर्चा रंगली आहे.

Add Comment

Protected Content